नवनाथ महाराज विकास मंच चा ढेकू रोडवरील टेकडीचे रुप पालटण्याचा निर्धार

अमळनेर : येथील रोटरी क्लब च्या वतीने काल ता.१९ रोजी गंगाराम सखाराम हायस्कूलच्या वर्धापनदिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात व ढेकू रोडवरील टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नवनाथ महाराज विकास मंचने ढेकू रोडवरील या टेकडीचे रुप पालटण्याचा निर्धार केला आहे. अमळनेर रोटरी क्लबने यासाठी ३० वृक्ष लागवड करून ३० संरक्षक जाळ्या व बागेश्री खत ची व्यवस्था करून दिली. टेकडी विकासासाठी काम करणाऱ्या मंचला प्रोत्साहन देत भावी काळात रोटरी क्लब तर्फे आणखी काही वृक्ष व संरक्षक जाळ्या उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, रोटरी क्लबचे पदाधिकाऱ्यांत प्रेसिडेंट रो.अभिजित भांडारकर, सेक्रेटरी रो.महेश पाटील, प्रोजेक्ट चेअरमन रो.सुबोध पाटील, रो.आशिष चौधरी, रो.पुनम कोचर, रो.देवांग शहा, रो.वृषभ पारख, रो.रोहीत सिंघवी, रो.अजय रोडगे पाटील, रो.डाॅ. राहूल मुठे, रो.प्रा.दिलीप भावसार, रो.प्रतीक जैन, रो.योगेश येवले, देवेंद्र कांबळे, रो.विशाल शर्मा, रो.डाॅ प्रतिम जैन, रो.देवेंद्र कोठारी, रो.शिबी वशिष्ठ, नवनाथ महाराज विकास मंच चे कार्यकर्ते आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
