अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या तक्रारींचे विद्युत विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी केले निराकरण

प्रामुख्याने ताडेपुरा व प्रताप मिल फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त वीजेचा भार असल्याचे मान्य

अमळनेर : येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने दि.६ जुलै २०२० रोजी अवाजवी बिलांच्या तक्रारी व वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्या बाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुषंगाने विद्युत विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे यांनी ग्राहक पंचायत अध्यक्ष व सदस्यांना आज सविस्तर चर्चेसाठी पाचारण केले होते. यावेळी ठाकरे यांनी तक्रारींचेेे निराकरण करताना एक एक मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितला.

वारंवार वीज पुरवठा का खंडित होतो ? याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रामुख्याने ताडेपुरा व प्रताप मिल फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त वीजेचा भार असल्याने तो भार कमी करून नवीन फिडर तयार करण्याबाबत माहिती विशद केली. जेणेकरून वारंवार वीज पुरवठा खंडित होणार नाही. लॉकडाऊनच्या काळात कंटेनमेंट झोन मध्ये मान्सून पूर्व कामे पूर्ण करता आली नाही. त्यामुळे या पावसाळ्यात पाऊस आल्यानंतर झाडाची फांदी जर तारा ला स्पर्श झाली तरी ट्रीप होऊ शकते. ती कामे आता सुरू असल्यामुळे हा त्रास पुढे होणार नाही. त्याचप्रमाणे कार्बन येणे, फ्यूज टाकणे वगैरे किरकोळ तक्रारींची कामे करताना त्या त्या भागापुरता वीज पुरवठा बंद करावा लागतो असेही त्यांनी स्पष्ट केले. बिलांच्या तक्रारींबाबत बोलताना ते म्हणाले की, ग्राहकांकडून तक्रारी आल्यानंतर अशा तक्रारी सोडवण्यात येतील. काही लगेच निराकरण करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चालू महिन्यात ग्राहकांना वीज बिल घरपोच मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना वीज बिल मिळत नसतील त्यांनी शेजारच्या ग्राहकांचे वीज बिलाची झेरॉक्स सोबत आणावी. जेणेकरून त्यांचा चक्र मार्ग चुकला असल्यास तो दुरुस्त करण्यात येईल. जेणेकरून त्यांना घरपोच बिल पुढील महिन्यात मिळेल. बऱ्याचदा ग्राहकांना क्रेडिट बिल निघाल्यास ते देण्यात येत नाही त्यामुळे ग्राहकांनी कार्यालयात येऊन बिल तपासून घ्यावे असे त्यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या काळात अमळनेर शहरवासियांना वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष काळजी घेत अहोरात्र मेहनत घेतली. एक प्रकारे त्यांनी कोरोना योद्धा म्हणूनच काम केले असल्याने ग्राहक पंचायतीतर्फे त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत ठाकरे, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे व वैभव देशमुख, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मकसूद बोहरी, सचिव विजय शुक्ल, ऊर्जा मित्र सुनील वाघ, ॲड.भारती अग्रवाल, योगेश पाने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख मेहराज हुसेन यांनी दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!