राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचे निषेधार्थ अमळनेर शहर व तालुका शिवसेना तसेच महाविकास आघाडीतर्फे तहसीलदार यांना निवेदन

अमळनेर : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी काल संसदेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेत असतांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय हे शब्द उच्चारले. यावर भाजपचे माजी नेते भारताचे उपराष्ट्रपती तथा राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ‘हे तुमचे घर नाही हे माझे चेंबर आहे. येथे बाकीच्या घोषणा चालणार नाहीत. तुम्ही नवीन आहात पुढच्या वेळेस लक्षात ठेवा’ असे सांगितले. याचा निषेध म्हणून अमळनेर शहर व तालुका शिवसेना तसेच अमळनेर महाविकास आघाडीतर्फे अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, जीवन पवार, रमेश पाटील, विजय पाटील, मनोज देवरे, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी, सनी गायकवाड, गोविंदा बाविस्कर, निनाद शिसोदे, अनिरुद्ध शिसोदे, उमेश पाटील, बाळू पाटील आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!