जिजाऊ बहुद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस गृपने राबविला उपक्रम
अमळनेर : कोरोना हा संसर्गजन्य असला तरीही विशेष काळजी घेतल्याने तो होत नाही व झालाच तर तो बरा देखील होतो म्हणून कोणीही या आजाराला घाबरुन न जाता नियमांचे पालन करा. कोरोना रुग्णाला दुर्लक्षित न करता मानसिक आधार द्या कारण आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही असे आवाहन ॲड.ललिता पाटील यांनी केले. जिजाऊ बहुद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस गृपच्या वतीने अध्यक्षा ॲड.ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहर व तालुक्यातील नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे मोफत वाटप करण्यात आले. ढेकु रोडवरील कै.मोठे बाबा मंदिर श्रीराम कॉलनी पासून शुभारंभ करण्यात आला. दर वर्षी जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने व्याख्यान, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, ट्री गार्ड वाटप असे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु या वर्षी कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात येऊन अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी एस.एम.पाटील, अशोक पाटील, वाल्मिक मराठे, भा.ज.पा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, वाय.ई.बारसे, नायब तहसीलदार बी.आर.शिंदे, प्राचार्य प्रकाश महाजन, मा.नायब तहसीलदार ए.टी.पाटील, कृ.ऊ.बा संचालक पराग पाटील, ॲड.नागराज माळी, प्रा.मोहसिन पठाण, जयवंतराव पाटील, वसंत पाटील, अविनाश जाधव, प्रविण पाटील, खा.शि.मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे, सुचिता पाटील, बाम्हणे उपसरपंच प्रकाश पाटील, भिलाली उपसरपंच अमोल माळी, वसंत पाटील, विजय श्रीराम पाटील, आर.व्ही.पाटील, सुखदेव चौधरी, सुनिल पाटील, शांतिलाल बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, निलेश वानखेडे, भुषण पाटील, राहुल पाटील, मनोज बिऱ्हाडे, हेमंत वाघ, महेश पाटील, विशाल हटकर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल माळी यांनी केले.