अमळनेर : शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत व जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या आदेशाने तालुकाप्रमुख विजय पाटील यांनी तालुका शिवसेना संघटक पदी महेश प्रभाकरराव देशमुख (गांधली) यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी गुलाबरावजी वाघ यांनी तालुकाप्रमुख विजय पाटील व शहरप्रमुख यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र दिले. महेश देशमुख हे बाजार समितीचे संचालक असून गांधली वि.का.सो. चे चेअरमन आहेत. खा.शि.मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक आदी पदांवर काम केले असून ग्रामीण भागात परिचित आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, अमळनेर विधानसभा संपर्कप्रमुख दिपक पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, माजी उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र देशमुख, माजी शहरप्रमुख नितीन निळे, नगरसेवक प्रताप शिंपी, माजी नगरसेवक राजू फापोरेकर, महिलाआघाडी उपजिल्हा संघटिका मनिषा परब, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, उपतालुका प्रमुख चंदू पाटील, शिवकुमार पाटील, विलास पवार, उपशहरप्रमुख जीवन पवार, मोहन भोई, शिववाहतुक सेना तालुका अध्यक्ष रमेश पाटील, शहर अध्यक्ष विनोद राऊळ, शिक्षकसेना तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, रामचंद्र परब, शहर संघटक चंद्रशेखर भावसार, व्यापारी सेनेचे जितेंद्र झाबक, विमल बाफना आदींनी अभिनंदन केले आहे.