देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल चा दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के

विरेंद्र पाटील….. वैष्णवी माळी….. राजेश पाटील…..

अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल चा मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा शंभर टक्के निकाल लागला. यावर्षीही शाळेने आपली गुणवत्ता कायम राखली आहे. विरेंद्र प्रविण पाटील या विद्यार्थ्याने ९०.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. वैष्णवी धनराज माळी या विद्यार्थीनीने ८५.४०% गुण मिळवून शाळेत व्दितीय तर राजेश बळीराम पाटील या विद्यार्थ्याने ८४.२०% गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांक मिळविला. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, सचिव श्रीमती मंदाकिनी पाटील व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!