शहरातील विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

अमळनेर : थोर साहित्य सम्राट, कामगार नेते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक….

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात मान्यवरांचे हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सिमा अहिरे, तहसीलदार मिलींद वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी विद्या गायकवाड, पोलीस प्रशासनाचे अधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ.राहुल निकम यांनी उपस्थितांशी संवाद साधत आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

सरस्वती विद्या मंदिर शाळा, अमळनेर

सरस्वती विद्या मंदिर शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रतिमा पूजनाने साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. उपस्थित शिक्षिका सौ संगिता पाटील, सौ.गीतांजली पाटील, शिक्षक आनंदा पाटील, परशुराम गांगुर्डे, ऋषिकेश महाळपूरकर आदींनी ही प्रतिमेस पुष्प अर्पण करून पूजन केले. यावेळी शिक्षकांनी मास्क वापरत कार्यक्रमास उपस्थिती दिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!