कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक पराग पाटील व देवेश्री पाटील यांच्या हस्ते होमहवन

अमळनेर : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत शेकडो वर्षांपासुन प्रतिक्षेत असलेल्या अखंड भारताचे अराध्य दैवत श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयोजीत करण्यात आले होते. अयोध्येत श्रीराम मंदिर होण्याची स्वप्नपूर्ती होत असल्याने देशात उत्साह व चैतन्याचे वातावरण होते. या भूमिपूजन सोहळा निमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा नेत्या ॲड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.श्याम पाटील व ॲड.ललिता पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली. तर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक पराग पाटील व देवेश्री पाटील यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले.

माजी मंत्री आ.गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंग द्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दिली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भिलाली माजी सरपंच दिनेश माळी, योगआचार्य कमलेश कुलकर्णी, बाम्हणे उपसरपंच प्रकाश पाटील, सामर्थ्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल माळी, राहुल पाटील, मनोज बिऱ्हाडे, कुंदन माळी, पराग कोल्हे, जयंत महाजन आदि उपस्थित होते. आचार्य सुनिल मांडे, सारंग पाठक व निलेश आसोदेकर यांनी पुजाविधी संपन्न केला.
