दहावी परिक्षेत मधुर पाटील चे घवघवीत यश; आयआयटी क्षेत्राकडे कल

अमळनेेर : येथील एन.टी.मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलचा विद्यार्थी मधुर पाटील याने दहावी परिक्षेत ९६.६० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह घवघवीत यश मिळविले आहे. मधुर हा पाटील ॲग्रो एजन्सी चे संचालक प्रशांत पाटील यांचा मुलगा आहे. बालवाडी पासून ते नववी पर्यंत A++ येण्याचं सातत्य मधुरने दहावीलाही कायम ठेवलं आहे. भविष्यात आयआयटी क्षेत्राकडे जाण्याचा कल असून स्वत:चा आत्मविश्वासावर दहावीचे चार पेपर शिल्लक असतांना श्री चैतन्य अकॅडमी, हैदराबाद येथे मार्च महिन्यात आयआयटी साठी प्रवेश घेतला असल्याचे त्याने दिव्यचक्र शी बोलताना सांगितले.

मुलाच्या यशाबद्दल श्री प्रशांत पाटील यांचेशी चर्चा केली असता, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. ते म्हणाले.. मुलांचं शिक्षण हीच खरी संपत्ती या एकमेव उद्देशाने खेडे गावातुन शहराकडे प्रस्थान केले. पाया मजबूत तर इमारत मजबुत… या विचाराने मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर जास्त भर दिला. मधुरने बालवाडी पासून ते नववी पर्यंत A++ येण्याचं सातत्य दहावीला कायम ठेवलं. मुलीनेही दहावी परिक्षेत ८५% आणि १२ सायन्स (Bio) विषय घेवून ७२% गुण मिळविले. तो उद्देश मुलांनी सार्थ ठरविल्याचा आज अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. भावी वाटचालीस दिव्यचक्र परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!