अमळनेर येथे विविध कार्यक्रमांनी विश्व आदिवासी दिन साजरा

क्रांतिवीर समशेरसिंग सिंग पारधी स्मारक विकासासाठी प्रा.जयश्री साळुंके यांनी दिले बसण्याचे बाक भेट.

अमळनेर : विश्व आदिवासी दिनानिमित्त आज शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व आदिवासी पारधी बंधू भगिनींनी आप आपल्या घरा समोर रांगोळी काढून दिवसाची सुरुवात केली. अमळनेर येथील क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकाच्या स्थळी रांगोळी काढून फुलांची सजावट करुन सुशोभीकरण करण्यात आले होते. सर्व प्रथम आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा.जयश्री दाभाडे यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व नंतर क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा.जयश्री दाभाडे यांनी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारक विकासासाठी दोन बसण्याचे बाक भेट दिले. या बाकांचा लोकार्पण सोहळाही यावेळी पार पडला.

आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. निसर्गाचे संवर्धन, संरक्षण करणे, जतन करणे आदिवासींचे आद्य कर्तव्य आहे आणि या दृष्टीने ढेकू रोडवरील नवनाथ टेकडीवर २५ झाडांचे रोपण करण्यात आले. यात वड, पिंपळ, उंबर, निंब, आंबा इ पर्यावरणीय संवर्धन दृष्टीने परिणामकारक आणि आरोग्यदायी वृक्षांचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा, पत्रकार प्रा जयश्री दाभाडे, संजय पारधी, पंडित पारधी, बबलू पारधी, धनराज पारधी, अनिल पारधी, मनोज पारधी, पुनमचंद पारधी, नूरखान, हिम्मत दाभाडे, आप्पा दाभाडे, जय पारधी, विनायक पाटील, मयूर साळुंके, भूषण पाटील, प्रमोद,पाटील, हितेश पवार आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!