
अमळनेर : कर्नाटकातील बेळगांव मनगुत्ती गांवातील छत्रपती शिवाजी राजे यांचा पुतळा कर्नाटकातील भाजपाच्या स्थानिक प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी रात्रीतून पोलीस बंदोबस्तात हटविल्यामुळे कर्नाटकसह महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये तिव्र पडसाद उमटले. अमळनेर येथील महाविकास आघाडीतर्फे कर्नाटक भाजपा शासनाचा निषेध करुन शिवाजी राजे यांचा पुतळा पुन्हा त्या जागेवर तातडीने पुनर्स्थापित करण्याची मागणी करत तहसीलदार यांना महाविकास आघाडीतर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी नारायण राणे यांचे पुत्राने शिवसेना उपनेते व पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांचा निषेध करण्यात आला. नामदार गुलाबभाऊ हे शिवसेनेचे निष्ठावंत मावळे असून शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. तुमच्या राणे परिवारासारखे दलबदलू कावळे नाहीत. ह्यापुढे आरोप करतांना विचार करा अन्यथा शिवसैनिकाशी गाठ आहे असा सज्जड ईशाराही राणे पुत्रांना दिला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख संजय पाटील, युवासेना उपजिल्हा अध्यक्ष श्रीकांत पाटील, तालुका संघटक महेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मुक्तार खाटिक, रा. विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील शिंपी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, भरत पवार, सुभाष देसले, माजी उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र देशमुख, माजी शहरप्रमुख नितीन निळे, नगरसेवक प्रताप शिंपी, नगरसेवक संजय भिल, जिवन पवार, मोहन भोई, उपशहरप्रमुख चंद्रशेखर भावसार शहर संघटक, वाहतूक सेना रमेश पाटील, सनी गायकवाड, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील आदी उपस्थित होते.