सिद्धेश्वर मंदिर घाटाचे काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन

अमळनेर : शहरातील तांबेपुरा, सानेनगर भागात सोमवारी आमदार अनिलदादांनी सदिच्छा भेट दिली. सानेनगर भागातील कार्यकर्ते व नागरिक यांची सिद्धेश्वर मंदिर येथे बैठक घेऊन चर्चा केली. तेेेेथील रहिवाशांंकडून त्यांनी या भागाच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्यांचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सानेनगर भागातील सिद्धेश्वर मंदिर घाटाचे काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
बोरी नदी पात्राची केली पाहणी…

अनेक शेतकरी बांधवाना शेतात जाण्यासाठी सानेनगर लगत असलेल्या बोरी नदी पात्रातून पलीकडे जावे लागते. बोरी नदीला पूर आल्यास शेतकरी बांधवाना पलीकडे जाण्यासाठी जागा नसते. शेतात जाण्यास निर्माण होणाऱ्या या अडचणीवर काहीतरी मार्ग काढला जाईल. तसेच या भागातील व्यायामशाळेत तरुणांना व्यायामासाठी साहित्य व स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात येणार असून स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील, महेश पाटील, रावसाहेब पहेलवान, सुभाष पवार, प्रकाश जिजाबराव पाटील, भिका नाना पाटील, सदाशिव पाटील, दिपक पवार, संजय पाटील, वसंत पाटील, प्रविण पाटील, गणेश पाटील, गुलाब पाटील, जगदीश पाटील, दादा पाटील गोविंदा बाविस्कर, सानेनगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.
