लायन्स क्लब, अमळनेर चा ऑनलाइन पदग्रहण सोहळा संपन्न

अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची तर सेक्रेटरी पदी विनोद अग्रवाल यांची निवड

अमळनेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दि.११ रोजी लायन्स क्लबचा ऑनलाइन पदग्रहण सोहळा संपन्न झाला. सन २०२० -२१ या वर्षासाठी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी डिगंबर महाले यांची तर सेक्रेटरी पदी विनोद अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी डिगंबर महाले यांचेकडे, मावळते सेक्रेटरी प्रसन्न पारख यांनी विनोद अग्रवाल यांचेकडे, तर मावळते ट्रेझरर अजय हिंदुजा यांनी कुमारपाल कोठारी यांचेकडे पदभार सोपविला. क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी ऑनलाईन पद्धतीने सर्वांचा शपथविधी करविला.

याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन योगेश मुंदडे यांची विशेष उपस्थिती होती. क्लबच्या सन २०२० -२१ च्या कार्यकारिणीत अध्यक्ष – डिगंबर महाले, फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट – विनोद अग्रवाल, सेकंड व्हाईस प्रेसिडेंट – योगेश मुंदडे, थर्ड व्हाईस प्रेसिडेंट – दिलीप गांधी, सेक्रेटरी – विनोद अग्रवाल, जॉईंट सेक्रेटरी – अनिल रायसोनी, ट्रेझरर – कुमारपाल कोठारी, जॉईंट ट्रेझरर – पंकज वाणी, टेमर- राजेश नांढा, टेल ट्विस्टर – महेंद्र पाटील यांचा समावेश आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!