अमळनेर पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील यांचे पती नाटेश्वर पाटील यांची प्राणज्योत मालवली

अमळनेर : तालुक्यातील जानवे येथील माजी सरपंच व अमळनेर पंचायत समिती च्या सभापती रेखाताई पाटील यांचे पती नाटेश्वर पाटील यांचे काल रोजी जळगाव जिल्हा रुग्णालयात कोरोना आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते ४८ वर्षांचे होते. कै.उदय वाघ यांचेेे ते खंदे समर्थक होते. गेल्या नऊ दिवसांपासून ते कोरोना आजाराशी झुंंज देत होते. सुरुवातीला त्यांना अमळनेेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्जही मिळाला होता. गुरुवारी पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. यामुुुळे पुुन्हा जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचविण्यासाठी माजी आमदार स्मिता वाघ यांनी आपल्या परीने प्रयत्न केले मात्र अशातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एकभाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!