भरवस येथे घर कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली महिला जागीच ठार; अन्य तीन जखमी

संसारोपयोगी वस्तूंचेही झाले मोठे नुकसान

अमळनेर : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. याचा हाता तोंडाशी आलेल्या पिकांना फटका बसत असतांनाच मातीच्या घरांना ही फटका बसतो आहे. तालुक्यातील भरवस येथील जुने मातीचे घर कोसळून सुशिलाबाई लोटन अवचिते ही ४० वर्षीय महिला जागीच ठार झाली तर घरातील अन्य तीन सदस्यही जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरवस येथील सुशिलाबाई अवचिते नामक महिला सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करण्यासाठी गेली असताना पावसाच्या संततधार सुरू असल्याने अचानकपणे पूर्ण घर कोसळले. त्यात ही महिला दाबली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय घरातील अन्य तीन सदस्यही जखमी झाल्याची दुर्घटना घडली. घर कोसळल्याचे लक्षात येताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेस काढण्यासाठी बराच वेळ शर्थीचे प्रयत्न केले. परंतु महिलेचा जीव वाचू शकला नाही. घर कोसळल्याने स्वयंपाक घरातील फ्रीजसह अंदाजे सुमारे सत्तर हजार रुपये किंमतीच्या संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी मारवड पोलीसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास भास्कर चव्हाण हे करीत आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!