धुळे येथील प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचे दुःखद निधन; रुग्णसेवेचा वसा घेतलेला वृक्ष उन्मळला

धुळे : येथील प्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचे आज दुःखद निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत रुग्णसेवेचा वसा घेतलेला वृक्ष उन्मळला. मृत्यू समयी ते ५१ वर्षांचे होते. पुणे येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोना व स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोना ची लागण होण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी रुग्णांची सेवा केली.
धुळ्यातील एक सहृदयी, मनमिळावू, मीत भाषी आणि सदैव हसतमुख असणारे डॉ.चुडामण पाटील सर्वांना परिचित होते. माऊथ ऑर्गन वर गाणी वाजवणे हा त्यांना छंद होता. तो सूर कायमचा हरपला. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानूून ते रुग्णांसाठी अहोरात्र झटले. अशा प्रामाणिक डॉक्टर ची एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. त्यांचे जाणे ही धुळे जिल्ह्यासाठी खूप मोठी हानी आहे. त्यांचे पश्चात पत्नी, वडील भाऊ, दोन मुली असा परिवार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !



Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!