इंदिरा गांधी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका शोभाताई पाटील यांचे दु:खद निधन

अमळनेर : येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका शोभाताई अशोकराव पाटील यांचे आज ता.२० रोजी जळगांव येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांना कोरोना आजाराची लागण झाल्याने जळगांव येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते. अखेर त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अशोकराव पाटील यांच्या त्या पत्नी तर येथील डी.आर.कन्या शाळेचे शिक्षक उमाकांत हिरे यांंच्या मातोश्री होत. त्यांच्या मागे पती, २ मुले, १ मुलगी, सुना व नातवंडे असा परीवार आहे.

त्यांच्या दुःखद निधनाने शालेय कुटुंबातील कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे . त्यांच्या आकस्मित निधनाची सहवेदना व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाऊ मुंदडा, सचिव नरेंद्रभाऊ मुंदडा, सहसचिव योगेशभाऊ मुंदडा, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!