पश्चिम भाग, महाराष्ट्र राज्य व नाशिक विभागात दहाव्या क्रमांकावर

अमळनेर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या पाहणीमध्ये हागणदारीमुक्त शहर, कचरामुक्त शहर व कागदपत्रे या बाबींची तपासणी स्वच्छ सर्वेक्षणात करण्यात आली. त्यात अमळनेर शहर हागणदारीमुक्तचे (ODF++) हे मानांकन मिळवून पश्चिम भाग (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात ) महाराष्ट्र राज्य व नाशिक विभागात पहिल्या १० व्या क्रमांकावर आले आहे. सन २०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षणात असलेल्या अमळनेर शहराचा १३० क्रमांकावरून या वर्षी हागणदारीमुक्त शहर मानांकनात १० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये अमळनेर शहराने एकूण ६००० गुणांपैकी ४१५९.४२ गुण मिळवून आपला ठसा उमटवला.
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये अमळनेर शहराने सुरेख कामगिरी व उत्तम व्यवस्थापन केले असून शहरातील जमा होणारा घनकचरा व सेफ्टीटॅन्क बार मधून निघणारा मैला यावर प्रक्रिया केंद्र सुरू केले असून घनकचरा केंद्र व मल निरसारण केंद्र या बाबी सर्वेक्षणात निरखून पाहिल्या गेल्या. शहरातील रस्ते, शौचालये, बगीचे, नाले, नदी, कार्यालये, मंदिरे याही बाबींवर सर्वेक्षण २०२० मध्ये कटाक्ष टाकण्यात आले व मूल्यांकन करण्यात आले.
नगरपरिषदेमार्फत या सर्वेक्षणाच्या योग्य व्यवस्थापन कामी तत्कालीन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२० चे नोडल अधिकारी तथा आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, प्र.आरोग्य निरीक्षक अरविंद कदम सर्व प्रभागातील मुकादम, आरोग्य विभागातील सफाई कामगार, या सर्वांनी मेहनत घेतली. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, वरिष्ठ लिपिक संजय चौधरी, बांधकाम विभागातील अशोक भामरे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, विजय सपकाळे, तसेच गेल्या दोन वर्षांपासून शहर समन्वयक म्हणून काम करणारे गणेश गढरी यांचेही विशेष सहकार्य लाभले. मिळालेल्या यशाबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील व सध्याच्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी अभिनंदन केले असून सर्वेक्षण २०२१ साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
