अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमळनेर तर्फे तहसीलदारांना निवेदन

अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासनाने केलेला अमानुष लाठीचार्ज व बुक्याच्या मारा घटनेचा केला निषेध

अमळनेेेर : धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्यावर पोलीस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज व बुक्यांचा मारा केला. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमळनेर तर्फे नुकतेेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार कार्यालयाचे आवारात घोषणा देत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

पोलीस प्रशासनाने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूक संमतीने अमानुष लाठीचार्ज व बुक्याच्या मारा केल्याचा आरोप अ.भा.वि.प.ने केला आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करताना कार मधून बघ्याची भूमिका घेणारे पालक मंत्री अब्दुल सत्तार व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे वचन देणारे परंतु नापास करणारे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अ.भा.वि.प. ने केली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा अ.भा.वि.प. तिव्र आंदोलन करेल असा ईशाराही देण्यात आला आहे. यावेळी शहरमंत्री निलेश पवार, सह शहरमंत्री प्रितेश पाटील, महाविद्यालय प्रमुख केशव पाटील, शहर विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे, वैभव पाटील, कृष्णा साळुंखे, अश्विन चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!