अमळनेर : पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री येथील मूळ रहिवासी दिलीप सूर्याजी पाटील (ह.मु. आययुडीपी कॉलनी, तांबेपूरा) यांची धर्मपत्नी आशाबाई पाटील यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी त्या ५८ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
गेली तीन वर्षांपासून त्या आपल्या पतीसह लहान मुलाकडेच सेलवास येथे वास्तव्यास होत्या. त्या आठ महिन्यांपूर्वी नाशिक येथे आपल्या मोठ्या मुलाकडे गेलेल्या होत्या. अशातच मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले. त्यांना जुना सांधेदुखी चा त्रास होवू लागल्याने त्या पाच महिन्यांपासून नाशिक येथेच मोठ्या मुलाकडे थांबून उपचार घेत होत्या. दि.२९ रोजी तब्येतीत अधिक बिघाड झाल्याने त्यांना नाशिक येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. अखेर.. प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यांचेवर नाशिक येथील अंबड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा नेम गुरुवार दि.१० सप्टेबर २०२० रोजी रामकुंड, पंचवटी, नाशिक येथे आयोजिलेला आहे. त्या हेमंत पाटील, गोपाल पाटील यांच्या मातोश्री तर दिव्यचक्र चे संपादक तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांच्या भगिनी होत.