धरणगांव येथील सा. दा. कुडे विद्यालयाचे क्रिडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यांचाही पुरस्काराने सन्मान

धरणगांव : जळगाव जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे हस्ते यावेळी धरणगांव येथील सा. दा. कुडे विद्यालयाचे क्रिडाशिक्षक सचिन लोटन सूर्यवंशी यांनाही जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ.नारायण खडके, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार, नगरसेवक नितीन बरडे उपस्थित होते.
क्रीडा संकुलाचा अध्यक्ष या नात्याने क्रीडाशिक्षक ,खेळाडू व क्रीडा संघटना यांना योग्य न्याय दिला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. तर कोरोना काळात क्रीडाशिक्षक यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली असल्याचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. प्रदिप तळवलकर यांनी तर पुरस्कारा विषयी माहिती सचिव राजेश जाधव यांनी दिली. सारजाई कुडे विद्यालय, धरणगाव येथे शालेय क्रिडा स्पर्धा, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर आदर्श खेळाडू तयार करण्यासाठी क्रिडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले. यामुळे ते विद्यार्थी प्रिय आहेत. ते मूळचे अमळनेेर तालुक्यातील खवशी येथील रहिवासी आहेत. आपण केलेल्या कामाची ही पावती असून यापुढे अधिक चांगले काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे असे त्यांनी दिव्यचक्रशी बोलतांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, किशोर पाटील, योगेश सोनवणे, समीर घोडेस्वार, विजय विसपुते, गिरीश महाजन, उमाकांत जाधव, पंकज पाटील जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ व जिल्हा युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. दिव्यचक्र परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन !
