महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर यांच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर यांच्या वतीने येथील धुळे रोडवरील शासकीय विश्राम गृह येथे दर्पणकार तथा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन नुकताच साजरा झाला. माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, न.प.च्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिव्य लोकतंत्र न्यूज च्या सन २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या मनोगतात कृषिभूषण साहेबराव पाटील म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी पत्रकार भवनासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन दिलेली असून कंपाऊंड चे काम सुरू आहे. भूमीपूजनावेळी श्री संत प्रसाद महाराज यांनी ५१ हजार रुपये, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी आपले एक महिन्याचे मानधन व मी १ लाख देणगी दिली आहे. लवकरच पत्रकार भवनाचे स्वप्न पूर्ण होईल. दरम्यान माजी आ. शिरीष चौधरी, मा.आ.डॉ.बी.एस.पाटील, मा.आ.स्मिताताई वाघ, तहसीलदार मिलींद वाघ यांनी भेट देऊन सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व पत्रकारांशी संवाद साधला. गोकुळ बोरसे, संदीप गायकवाड, संजय चौधरी, हरी भिका वाणी, विक्रांत पाटील, मनोज पाटील, श्याम पाटील, महेश पाटील, राकेश पाटील, मकसूद बोहरी, विजय शुक्ल, माधुरी पाटील, अंकिता पाटील, सुरेश पाटील, साखरलाल महाजन, सचिन पाटील, श्रीकांत पाटील, सुनिल शिंपी, सनी गायकवाड आदींनीही उपस्थिती देत पत्रकार बांधवांचा सत्कार केला. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक डिगंबर महाले, सल्लागार विवेक अहिरराव, उमेश धनराळे, जयश्री साळुंखे, पांडूरंग पाटील, तालुका अध्यक्ष चंद्रकांत काटे, सचिव भटेश्वर वाणी, उपाध्यक्ष विजय गाढे, मिलिंद पाटील, सहसचिव जितेंद्र पाटील, खजिनदार ईश्वर महाजन, गौतम बिऱ्हाडे, भूपेंद्र पाटील, सचिन चव्हाण, गं.का.सोनवणे, संजय सूर्यवंशी, योगेश महाजन, जयंतीलाल वानखेडे, गुरुनामल बठेजा, समाधान मैराळे, संजय मरसाळे, नूर खॉ पठाण, अजय भामरे, भरत पवार, आर.जे.पाटील, राहुल पाटील, पंडीत चौधरी, रवी मोरे, विनोद कदम, दिनेश नाईक, युवराज पाटील, सुरेश कांबळे, सुकदेव ठाकूर, सुनिल करंदीकर, रोहीत बठेजा आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी तर भटेश्वर वाणी यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!