पातोंडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यिका श्रीमती जिजाबाई दगाजी पाटील या दिनांक ३१ मे २०२१ रोजी आरोग्य खात्याची ३४ वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्या आहेत. यानिमित्ताने आरोग्य केंद्राचे आवारात सरस्वती पूजन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रोशन राजपूत, डॉ. प्रशांत कुलकर्णी, चव्हाण भाऊसाहेब, आरोग्य सहाय्य्क भदाणे आबा, आरोग्य सेविका एस.बी.गिते, एम.ए.हिरोळे, आश्विनी पाडळे, MPW एहीदे, शिपाई कृष्णा, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे अपंगत्वावर मात करत त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सन १९८७ ते २००८ या काळात प्रा.आ.केंद्र मारवड उपकेंद्र शहापूर येथे, सन २००८ ते २०१७ या काळात प्रा.आ.केंद्र शिरसोदा ता.पारोळा उपकेंद्र इंधवे येथे तर सन २०१७ ते २०२१ या काळात प्रा.आ.केंद्र पातोंडा ता. अमळनेर येथे त्यांनी सेवा केली आहे.
समारोपप्रसंगी सौ. पाटील यांनी सांगितले की, माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वांनी मला मोलाची साथ दिली. सहकाऱ्यांसोबत खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मी आपले हृदय जिंकू शकलो आहे की नाही ? माहित नाही. पण.. माझ्याकडून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफ करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. पंचायत समिती अमळनेर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी व स्टाफ तसेच प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, फार्माशिष्ट, शिपाई, परिचर, ड्रायव्हर यांचे चांगले सहकार्य मिळाले.