
धुळे : तालुक्यातील बोरविहीर विद्या प्रसारक संस्था संचलित माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे शाळेच्या मुख्याध्यापिका पदी श्रीमती एस.ए.पाटील यांची नुकतीच काल दिनांक १ जून २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी संस्थेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी पदभार स्विकारला. शाळेच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून त्यांना संधी मिळाली आहे. याप्रसंगी बोरविहीर संस्थेचे उपाध्यक्ष वसंतराव संतोष सोनवणे, संचालक आनंदा बाजीराव सोनवणे, बोरविहीर विद्यालयाचे प्राचार्य पी.बी.सोनवणे, ज्येष्ठ शिक्षक एस.बी.सोनवणे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापिका श्रीमती एस.ए.पाटील यांचा सत्कार करण्यात येऊन नवीन जबाबदारी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बोरविहीर विद्यालयाचे नवनियुक्त उपमुख्याध्यापक ए.एस.पाटील, पर्यवेक्षक आर.एस.सोनवणे यांचाही यावेळी सत्कार व अभिनंदन करण्यात आले. वेल्हाणे विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. दिव्यचक्र परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन !
