सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व उपसरपंच संदीप जगन्नाथ शिंदे यांचे स्वखर्चातून महाप्रसादाचा कार्यक्रम

अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी येथे कोरोना नियमांचे पालन करत संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी भक्तीपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक पाटील यांनी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे सपत्नीक पूजन केले. त्यानंतर संत सावता महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी संपूर्ण गावाला सरपंच सरलाबाई पुंडलिक पाटील व उपसरपंच संदीप जगन्नाथ शिंदे यांनी स्वखर्चातून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बैसाणे, कल्पनाबाई चंद्रभान माळी, मंदा चंद्रकांत माळी, आनंद नगराज भिल, अनिता छोटू मोरे, वैशाली निलेश माळी, गोपाल सुदाम माळी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवलदादा पाटील, धर्मराज पाटील, माधवराव पाटील, शंकर बैसाणे, दंगल लालचंद मोरे, उखर्डु बैसाणे, राजाराम बंडू बैसाणे, विश्वास पाटील, पिरन निकम, आनंदा पाटील, नाना दयाराम पाटील, पोलीस पाटील अविनाश बैसाने, छोटू मोरे,
पुंडलिक छबिलाल पाटील, दिनेश गंजीधर पाटील, गोविंद शिंदे, भटू त्र्यंबक पाटील, सुभाष सखाराम पाटील, दिपाली प्रवीण पाटील, गिताबाई रवींद्र पाटील, सुरेखा शिवाजी पाटील, रेखाबाई संभाजी पाटील, सुनंदा तानाजी पाटील आदींनी परिश्रम घेतले. विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
