
पारोळा : तालुक्यातील शेवगे बुाा. येथील आनंदराव दिपचंद पाटील यांचे चिरंजीव संजय आनंदराव पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून फार्मास्युटीकल मधुन पीएच डी (विद्यावाचस्तपती) पदवी पूर्ण केली. त्यांनी Novel analytical development laboratories method for some api and dosage शास्रशोध पध्दतीने तयार केलेल्या अँनॅलिटीकल माहितीचे वापर करून रिजल्ट निर्माण करणे या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना गाईड डॉ. बी.आर.चौधरी Msc PhD, माजी प्राचार्य शिंदखेडा काँलेज तसेच मार्गदर्शक डॉ. नयन गढरी Scientist Saudi Arabia यांचे मार्गदर्शन लाभले.
संजय पाटील यांनी फार्मास्युटीकल विषयात पीएच डी प्राप्त करून शेवगे बुद्रुक गावाची मान उंचावली आहे. शेतकरी कुटुंबातून व वडीलांकरवी कोणताही शैक्षणिक वारसा नसतांना त्यांनी Msc Bed नंतर पीएचडी पर्यंत मजल मारली. त्यांच्या या यशाने शेवगे बुद्रुक आणि परीसरातील विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. संजय पाटील यांची नुकतीच परदेश दौऱ्यासाठी निवड झाली असून ते परदेशात रवाना होणार आहेत. शेवगे येथील दयाराम आनंदराव पाटील (माध्य. शिक्षक) यांचे ते लहान बंधू आहेत. समस्त ग्रामस्थांनी त्यांच्या यशात सहभागी सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !
