आज ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन

अमळनेर : उद्योग-व्यवसायातील फोर्ब्स सारख्या आंतरराष्ट्रीय मासिकाने दखल घेतलेले अत्यंत नामांकित असे व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध बँकर, लेखक विश्वास जयदेव ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या कथासंग्रहाच्या तृतीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा येथील रोटरी हॉल येथे आज (८ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता संपन्न होत आहे. अमळनेर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी वाड्मय मंडळ, पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांच्या हस्ते कथासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी ते साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान ला भेट देऊन तेथे वृक्षारोपण करणार असल्याचे स्मारक प्रतिष्ठान तर्फे कळविण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी, साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, शब्दमल्हार प्रकाशन चे प्रकाशक स्वानंद बेदरकर, सुदाम महाजन, ग्रंथ तुमच्या घरी चे विनायक रानडे, आकाशवाणी चे अनिरुद्ध कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात उपस्थित साहित्यिकांच्या साहित्यिक गप्पा रंगणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आबा महाजन यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. अमळनेर मधील साहित्य, संस्कृती चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आयोजिलेल्या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक मसाप चे कार्यवाह रमेश पवार, म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, गौरीसुत प्रतिष्ठानचे संदीप घोरपडे, शिव बहुद्देशीय प्रतिष्ठानचे रणजित शिंदे, प्रा.लिलाधर पाटील, सानेगुरुजी ग्रंथालय चे सचिव प्रकाश वाघ तसेच कार्यक्रम आयोजक लेखक व युवा उद्योजक वेदांशु पाटील आदिंनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!