पुणे शहराला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभाविप तर्फे निदर्शने

पुणे : शहरात आठवडाभरापूर्वी एका १४ वर्षीय चिमुरडीवर एकूण तेरा नराधमांनी सलग २ दिवस पाशवी बलात्कार केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे शहराला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. याचाच भाग म्हणून आज (दि.९) येथील अभाविप तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पिडीत युवतीला न्याय मिळावा यासाठी राज्य सरकार च्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.

पुणे शहर म्हणजे विविध वैशिष्ट्य असलेले शिक्षणाचे माहेरघर. ऐतिहासिक अशा या पुणे शहराला काळीमा फासणारी घटना दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर या कालावधीत घडली. मित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर तिच्या वर सामूहिक अत्याचार केले ही अत्यंत गंभीर व घृणास्पद घटना आहे. पिडीत युवतीला न्याय मिळावा, राज्य सरकारच्या मंत्री मंडळात असलेल्या मंत्र्यांवर जे महिला अत्याचारांचे आरोप झाले आहे त्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी करीत रोष व्यक्त करण्यात आला. राज्यात महिलांवर अत्याचार होणाऱ्या घटना वारंवार घडत असून महिला सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः विशेष लक्ष घालून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलावीत. हा खटला जलद न्यायालयात (Fast Track Court) चालविण्यात यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा.. अभाविप या पेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अशा मागण्या करत अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर व कार्यकर्ते यांनी आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!