२३ सप्टेंबर पासून चार चाकी वाहनांची नोंदणी नव्या मालिकेने सुरु होणार

पसंतीच्या नंबर साठी दि.१५ सप्टेंबर पासून अर्ज सादर करावयाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील चार चाकी वाहनांची नवीन नोंदणी एम.एच. १९ / डी.व्ही. ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका २३ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या पसंतीचा नंबर हवा असेल त्यांनी १५ सप्टेंबर पासून आपले अर्ज सादर करावयाचे आहेत. हे अर्ज दुपारी चार वाजेपर्यंत स्विकारले जातील. अर्जासोबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नावाने शासकीय शुल्काचा धनादेश असावा. विहित रकमेचा भरणा करून क्रमांक मालिका सुरू झाल्यावर आपल्या पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावयाचा आहे. आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यानंतर वाहनाची कागदपत्रे त्वरित सादर करणे अनिवार्य राहील.

एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या आकर्षक क्रमांक करिता दि.२२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजेपर्यंत बंद लिफाफ्यातून वाढीव शुल्काचा धनादेश सादर करणे बंधनकारक राहील. दि.२३ सप्टेंबर रोजी बंद लिफाफे उघडण्यात येऊन यातील जास्तीचे शुल्क असणाऱ्या अर्जदारास नोंदणी क्रमांक देण्यात येईल. अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!