
अमळनेर : येथील राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी गुरुवारी जनआक्रोश रॅली काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन तेथून मोटरसायकल रॅली तहसील कार्यालयावर आणण्यात आली. रॅली वेळी शेतकरी विरोधी पास झालेल्या कायद्याविरोधात विविध घोषणा देत निदर्शने करण्यात आली. यावेळी किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील व शिवाजी दौलत पाटील यांनी भाजपा सरकारने शेतकरी विरोधी पास केलेल्या तीन कायद्यांबाबत माहिती दिली. भाजपा सरकारचे अर्थव्यवस्थेचे अपयश, शासकीय संस्था संघटन, विक्री संदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने तालुका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. राष्ट्रपती महोदयांपर्यंत निवेदन पोहोच करण्याचीही विनंती केली.
निवेदनामध्ये, कृषी विषयक पास झालेले तीन कायदे रद्द करावेत, covid-19 काळात मजुरा संदर्भात केलेला कायदा मागे घ्यावा, विद्यार्थ्यांसंबंधी कायद्यात गरीब व श्रीमंत विद्यार्थी भेदभाव न करता समान शिक्षण संधी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा अन्यथा शेतकरी विज बिल भरणा व कोणतेही कर्ज भरणार नाहीत, संपूर्ण देशात ईव्हीएम मशीन वर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशा मागण्या आहेत. जन आक्रोश रॅलीत विश्वासराव पाटील, रमेश बोढरे, श्यामकांत पाटील, किसान सेलचे अध्यक्ष सुरेश पाटील, बी.के.सूर्यवंशी, कुदरत अली, मोहम्मद अली, शालिग्राम पाटील, शांताराम पाटील, जितेश संदानशिव, प्राध्यापक सुभाष पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
