कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल, अमळनेर येथे बैठकीचे आयोजन

अमळनेेर : देशभर ओबीसींच्या प्रश्नांवर राजकारण चांगलेच तापले असून महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण काढून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. याचा मोठा फटका महाराष्ट्रात बसणार असल्याचे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण रद्द करण्यात आले आहे. शासकीय निमशासकीय, खाजगी संस्थेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. हे सर्व कां व कशामुळे घडते आहे हे आपल्याला सामुदायिकरीत्या समजून घ्यायला हवे व आपली एकता अधिक मजबूत करायला हवी. यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या पुढाकाराने जळगाव येथे दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हास्तरीय भव्य ओबीसी आरक्षण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला ज्येष्ठ ओबीसी नेते नामदार छगन भुजबळ, नामदार धनंजय मुंडे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ ओबीसी नेते शब्बीर अंसारी, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते राम हरी रुपणवार ( लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे आदी मान्यवर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
भव्य ओबीसी आरक्षण हक्क परिषद यशस्वी करण्यासाठी पूर्व नियोजनाची बैठक बुधवार, दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथील हॉलमध्ये आयोजित केली आहे. या बैठकीत परिषदेला जाण्याचे नियोजन, प्रचार-प्रसारासाठी नियोजन करावयाचे असल्याने जळगाव जिल्हा ओबीसी समाज समन्वय समितीचे नेते बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. कृपया सर्व ओबीसी बंधू-भगिनींचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने ओबीसी बंधू-भगिनींनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी हक्क परिषद समन्वय समिती, अमळनेर यांनी केले आहे. याकामी प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत, राजेंद्रसिंह पाटील, अमोल माळी, सत्तार माया, पन्नालाल मावळे, सुधाकर कोठावदे आदी प्रयत्न करीत आहेत.
