
धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील फागणे जि.प.गटातून इंजिनिअर सौ.आश्विनीताई पाटील व पंचायत समिती उमेदवार सौ. शैलाताई सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ नुकतेच भाजपा प्रचार कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कामराज निकम, धुळे भाजपा महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे महानगर पालिकेचे नवनिर्वाचित महापौर प्रदिप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, भाजप प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, भाऊसाहेब देसले, राम भदाणे, प्राध्यापक अरविंद जाधव, किशोरजी सिंघवी, धुळे ग्रामीण भाजपा अध्यक्ष बबलू शेठ, भाजपा युवा मोर्चा चे सचिव अनिकेत पाटील, गोकुळ सिंघवी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केलेला धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण १४४ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने येत्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी अशी घोषणा केल्यानंतर निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर या भाजपा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.