जागतिक स्वच्छता दिनानिमित्त दाऊदी बोहरा समाजातर्फे पैलाड भागातील सैफीबाग येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम

अमळनेर : येथील पैलाड भागातील सैफीबाग येथे जागतिक स्वच्छता दिनाच्या निमित्ताने दाऊदी बोहरा समाजातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने केली. मुस्तफा सैफी याने कुराण पठण केले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्य अधिकारी संदीप गायकवाड, इंजि.अमोल भामरे, बांधकाम सभापती सुरेश पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, विनायक मराठे उपस्थित होते. सोबत समाजाचे अध्यक्ष शेख एहसान भाई बुरहानी, सचिव शेख मोहम्मद भाई करमपूर वाला, मु. अब्बासभाई होते.

कार्यक्रमात बोहरा समाजातर्फे प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उबे सैफी याने आपले घर व परिसर कसे स्वच्छ ठेवता येईल ? आपल्या जीवनात झाडांचे महत्त्व काय ? याबाबत माहिती दिली. हे सर्व कार्य आमचे धर्मगुरु सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन (त.ऊ.श.) यांच्या प्रेरणेने होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छता अभियान या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अब्देअली बुकवाला प्रथम तर बुरहानुद्दीन सैफी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुणे व बालकांच्या हस्ते २१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. मकसद बोहरी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका रशिदा सैफी, अहमद बुरहानी, खोजेमा सैफी, हुझेफा इझी, अजीज बोहरी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!