आंतर भारती पुणे शहर शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी अंजली कुलकर्णी तर उपाध्यक्ष पदी अमळनेर येथील मयूर बागूल

पुणे : येथील आंतर भारती पुणे शहर शाखेची नवी कार्यकारिणी आंतर भारती ट्रस्ट चे राष्ट्रीय सचिव अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली आज जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी अंजली कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी अमळनेर येथील मयूर बागूल यांचा समावेश आहे. आंतर भारती ट्रस्ट ही परम पुज्य साने गुरुजींनी स्थापन केलेली संस्था आहे. संपूर्ण देशात आंतर भारतीचे कार्य सुरु असते. विशेषतः साने गुरुजींच्या विचाराने व प्रेरणेने आंतर भारतीचे कार्य चालते.

अन्य कार्यकारिणीत, उपाध्यक्ष पदी मयूर बागूल व सचिन दुर्गाडे, सचिव : राम माने, सहसचिव : स्वाती दाढे, कोषाध्यक्ष : हितेंद्र चौधरी, सह कोषाध्यक्ष : स्वधा आर्य-शहा यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारणीत साहित्यिक, समाजकार्य, शिक्षक क्षेत्रातील मंडळीसह विविध क्षेत्रातील सदस्य आहेत. आंतर भारती चे कार्य समजून घ्यावयाचे असेल तर संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे. नवीन कार्यकारिणी चे सर्व उपस्थित सदस्यांनी अभिनंदन केले. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!