मसाप, अमळनेेर शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आज काव्य मैफिलीचे आयोजन

अमळनेर : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित कवींचे काव्य संमेलन आज दि.२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय येथे आयोजित करण्यात आले आहे. काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन असणार आहेेत. निमंत्रित कवींमध्ये प्रकाश पाटील (पिंगळवाडे), प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी (धुळे), डॉक्टर कुणाल पवार (अमळनेर), जयराम मोरे (सोनगीर), रमेश धनगर (गिरड), शरद पाटील (अमळनेर) यांचा सहभाग असणार आहेे. सर्व साहित्य प्रेमींनी कवी संमेलनाला हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!