धरणगाव तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे महेश वाघ यांचा सत्कार

राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवत कुस्तीपटू महेशने उमटविला आपला ठसा

धरणगाव : येथील कुस्तीपटू महेश रमेश वाघ याने हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती खेळात ५५ किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करुन सुवर्ण पदक मिळवत आपला ठसा उमटविला. याबद्दल धरणगाव तालुका क्रीडा शिक्षक महासंघातर्फे महेश वाघ व त्याचे क्रीडा मार्गदर्शक संदीप धनगर यांचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बुके व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यशासाठी कुस्तीपटू महेश वाघ यास विविध सोयी सुविधा मिळाल्यास तो धरणगावचे नाव नक्कीच जागतिक स्तरावर उंचावेल असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी धरणगाव तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी तसेच डी. एन. पाटील, एम. डी. परदेशी, कैलास माळी, आर. बी. महाले, सेवानिवृत्त प्रा. ए. जी. शिंदे, व्ही. पी. महाले, प्रकाश कदम, हेमंत माळी, नितिन पाटील, जितेंद्र ओस्तवाल, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, विकास शिरसाठ, के. एस. पाटील, एम.एम.सैय्यद आदी उपस्थित होते. सर्व उपस्थित क्रीडा शिक्षक व नागरिकांनी महेश वाघ व त्याचे मार्गदर्शक संदीप धनगर यांचे अभिनंदन करीत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी केले. क्रीडा महासंघाचे सचिव हेमंत माळी यांनी आभार व्यक्त केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!