बेटी फाउंडेशन तर्फे दहिवद येथील सरपंच सुषमा देसले आंतरराष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित

अमळनेर : तालुक्यातील दहिवद येथील सरपंच सुषमा वासुदेव देसले यांनी ग्राम विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे. बेटी फाउंडेशन, वणी जि.यवतमाळ यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत काल संध्याकाळी वणी येथील प्रिन्स गार्डन ला ‘आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार ‘ देऊन सन्मानित केले. यावेळी मान्यवर नगराध्यक्ष, जि.प.सदस्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व संघटनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते.

दहिवद गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाव, स्त्री भ्रूणहत्या यासारख्या ज्वलंत विषयांवर सौ.देसले यांनी पथनाट्याचे सादरीकरण करुन जनजागृतीचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यात त्यांचे पती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे नियमित मार्गदर्शन लाभते. यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून ‘राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार’, नाशिक येथे पोलीस टाईम्स कडून ‘सक्षम महिला रत्न पुरस्कार’, भरारी फौंडेशन सुरत यांचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ देऊन सौ. सुषमा देसले यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!