चौबारी येथे स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नाने ५०० जणांनी घेतला लाभ

अमळनेर : जिल्हा परिषद जळगाव आयोजित सेवा व समर्पण अभियानांतर्गत भाजपाचे आमदार गिरीष महाजन आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नातून आज दि.२७ रोजी अमळनेर तालुक्यात लसीकरणाचा महाकुंभ पार पडला. अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी सुमारे १० हजार १०० जणांना लसीकरण करण्यात आले. पैकी चौबारी येथे ५०० जणांना लसीकरणाचा लाभ मिळाला. लसीकरण दरम्यान स्मिताताई वाघ यांनी धावती भेट देत लसीकरणाची पाहणी केली. यावेळी सोबत तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, शहर युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, तालुका युवा मोर्चा चिटणीस निखिल पाटील आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात मल्हारी दंगल पाटील, रवींद्र मोरे आणि संजय पाटील यांनी चौबारी गावात लसीकरण व्हावे म्हणून स्मिताताई वाघ यांच्याकडे तगादा लावला होता, त्या विनंतीला मान देत स्मिताताई वाघ यांनी चौबारी गावासाठी ५०० कोविशिल्ड डोस उपलब्ध करुन दिले.
मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निलेश सोनवणे, आरोग्य सहाय्यक अशोक अधिकार, आरोग्य सेविका पी. एन. ईशी, आरोग्य सेवक किरण चौधरी, गट प्रवर्तक आशा पाटील, आशा सेविका मिना पाटील, भारती पाटील यांनी लसीकरणाची जबाबदारी पार पाडली. याकामी अंगणवाडी सेविका निर्मलाबाई पाटील, मिना पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे, जगतराव पाटील, योगेश अहिरे, तुषार पाटील, समाधान पाटील, विकी पाटील, चेतन पाटील, योगेश पाटील, हेमंत पाटील, बाळा पाटील आदींचे सहकार्य लाभले.
