श्री मंगळग्रह सेवा संस्थान शासनाच्या ‘पर्यटन मित्र’ पुरस्काराने सन्मानित

संस्थान चे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी पुरस्कार स्विकारला

अमळनेर : राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे धार्मिक क्षेत्रात पर्यटन वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अमळनेेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थान ला शासनाचा ‘पर्यटन मित्र’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिनांक २७ रोजी मंगळग्रह सेवा संस्थान चे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह हा पुरस्कार स्विकारला. पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासनाकडून कृषी, धार्मिक, ऐतिहासिक, ग्रामीण कला, संस्कृती तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

व्यासपीठावर पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितीन कुमार मुंडावरे, उपअभियंता ज्ञानेश्वर पवार, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे राजेंद्र बकरे, नितीन सोनवणे, जयेश तळेगावकर, पत्रकार रमेश पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंगळग्रह सेवा संस्थान चे अध्यक्ष डिगंबर महाले यांना पुरस्कारार्थी मधून आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. त्यांनी धार्मिक पर्यटनाचे स्वरूप, व्याप्ती व अर्थकारण यावर सविस्तर माहिती देत मंगळग्रह मंदिराच्या धार्मिक पर्यटन विकासाच्या यशाचे गमक सांगितले. या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थान चे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी ए. सोनवणे, बांधकाम अभियंता संजय पाटील, सेवेकरी आर जे पाटील, उमाकांत हिरे, राहुल पाटील, भूषण पाटील देखील उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!