कोरोनामुक्त मतदार संघासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांचे प्रयत्नातून आज महा लसीकरण अभियानाचे आयोजन

अमळनेर येथील सानेगुरुजी शाळेत होणार लसीकरण

अमळनेर : कोरोनाने जगभर थैमान घातल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावर उपाय म्हणून लस उपलब्ध झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने सर्व देशभर लसीकरण करण्यात येत आहे. आपल्या मतदारसंघात १०० टक्के लसीकरण पूर्ण करुन मतदार संघ कोरोनामुक्त व्हावा यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांचे प्रयत्नातून लसीकरणापासून वंचित राहिलेल्यांसाठी आज दि.१ ऑक्टोबर रोजी महा लसीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर येथील सानेगुरुजी शाळेत लसीकरण केले जाणार आहे. सकाळी ९ वाजेपासून महा लसीकरण अभियानास प्रारंभ होणार असून तत्पूर्वी सकाळी आठ वाजेपासून शिबीर स्थळी नाव नोंदणीस सुरुवात होणार आहे.

सदर शिबीर १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी खुले राहणार असून याठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचे डोस सर्वाना देण्यात येणार आहेेत. आयोजकांनी महा लसीकरण अभियानाची जोरदार तयारी केली असून ‘मागेल त्याला लस’ हेच उद्दिष्ट असणार आहे. अभियानास आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे. शिस्तबद्ध पद्धतीने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या धोरणानुसार लसीकरण करण्यात येणार आहे. अभियानात दिव्यांग, गरोदर महिला, स्तनदा माता व वयोवृद्ध नागरिकांसाठी प्राधान्य देण्यात येणार असून स्वतंत्र रांग असेल. महाविद्यालयीन युवक युवतींसाठी देखील स्वतंत्र रांगेेेेची व्यवस्था असेल. त्यासोबतच सर्वसाधारण महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र दोन रांगा असतील. ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व नागरिकांनी महा लसीकरण अभियानाचा लाभ घेऊन अमळनेेर मतदारसंघ कोरोना मुक्त करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील मित्र परिवाराने केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!