अमळनेर : सन २०१९ च्या खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन अमळनेर विधानसभा मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, संजय पुनाजी पाटील, सुभाष पाटील, अशोक पवार सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, काँग्रेस आय शहराध्यक्ष मनोज पाटील, युवक शहराध्यक्ष बाळू पाटील, रणजित पाटील, आबिद अली, मिलिंद पाटील, संजय पाटील, बाबुराव महाजन, दिलीप पाटील, कल्पना पाटील, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष राहुल गोत्राळ, विद्यार्थी तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, गोविंदा बाविस्कर, दीपक शिसोदे, समाधान पाटील, दीपक पाटील, अभिषेक धुमाळ, रविकिरण पाटील, कल्पेश गुजराथी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्तेे व शेतकरी बांधव उपस्थित होते.