विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अमळनेर मतदार संघात पक्षाशी गद्दारी केली त्या सर्वांना भाजप जागा दाखविणार
अमळनेर : विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिरीष चौधरी यांना निवडून आणण्यात कसूर करणारे गद्दार कोण ? याचा अहवाल मागवून दोषी असलेल्यांना निश्चित जागा दाखवली जाईल. अमळनेर विधानसभा मतदार संघात शिरीष चौधरी यांचे नेतृत्व आधी पेक्षा जास्त ताकदीने उभे करण्यासाठी पक्षाकडून त्यांना हवे ते सगळे बळ पुरविले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौधरी बंधूंना दिली. झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू उद्योगपती डॉ. रवींद्र चौधरी यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
अमळनेर विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टी तर्फे शिरीष चौधरी यांनी उमेदवारी देेेण्यात आली होती. परंतु थोड्या मतांनी निसटता पराभव झाला. मतदार संघातील ८५ हजार इतके मतदान करणाऱ्या मतदारांना सुद्धा या निकालामुळे धक्का बसला असून पक्षातील शिरीष चौधरी यांच्या हितशत्रूंनी केलेली गद्दारी आणि विरोधी उमेदवाराने केलेले जातीपातीचे राजकारण यामुळे शिरीष चौधरी यांना अपयश आल्याचे स्पष्ट दिसले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चौधरीी बंधूूूूनी आपल्या समर्थकांसह मुंबईत जाऊन मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्याचे कौतुक केेेलेे व म्हणाले की, “तुमच्या कार्यावर विश्वास ठेवून भाजपाला ८५ हजार मतदान देणाऱ्या एकाही मतदाराच्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही. तुम्हाला हवे ते सर्व बळ पक्ष देत राहील आणि तुम्हाला पक्षाच्या प्रमुख प्रवाहात आणले जाईल.” ज्यांनी या निवडणुकीत पक्षाशी गद्दारी केली त्या सर्वांना पक्ष जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही आणि पदे देऊन मोठे केलेल्या अशा लोकांना पक्ष संपविल्याशिवाय राहणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.