पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल ईश्वर महाजन यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड जाहीर

अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी हायस्कूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूलचे शिक्षक तथा दैनिक साईमतचे तालुका प्रतिनिधी ईश्वर रामदास महाजन यांची पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल देशातील नामांकित संस्थेच्या वतीने सन २०१९ च्या वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड साठी नुकतीच निवड झाली आहे. निवडीचे पत्र संस्थेचे अध्यक्ष दत्ता विघावे, श्रीरामपूर यांनी पाठविले आहे.
समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाप्रती असलेली निष्ठा जपण्याच्या हेतूने सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींंना सन्मानीत करण्यात येतेे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांना ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड ‘ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांना ता. २३ डिसेंबर २०१९ रोजी श्रीरामपूर येथे सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. WCPA चे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टीन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!