अमळनेर : जळगाव जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेेर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भालचंद्र भिमराव पाटील आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने अमळनेेर येथील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता श्री खांबोडे, श्री बोरसे, लिपिक परेश पाटील, कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी कार्यालयात छोटेखानी सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भालचंद्र पाटील हे तालुक्यातील खवशी येथील मूळ रहिवासी असून जिल्हा परिषदेत गेली ३५ वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली आहे. सत्कारावेळी युनियनचे उपाध्यक्ष रविंद्र मोरे, सलीम पाटील, शंतनु पाटील, प्रसाद कापडे, तुषार पाटील, नरेश सूर्यवंशी व कर्मचारी बांधव आदी उपस्थित होते.