एकविसाव्या शतकात स्त्री सामर्थ्यवान असूनही घडणाऱ्या वाईट घटना पाहता स्त्रियांनी धाडसी होण्याची गरज : प्राजक्ता गायकवाड

विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वाटप आणि सत्कार

अमळनेर : महाराष्ट्राला थोर आणि महान स्त्रियांचा इतिहास लाभलेला आहे. एकविसाव्या शतकात स्त्री सामर्थ्यवान असूनही घडणाऱ्या वाईट घटना पाहता स्त्रियांनी धाडसी होण्याची गरज असल्याचे मत स्वराज्य रक्षक मालिकेतील महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारलेल्या प्राजक्ता गायकवाड यांनी व्यक्त केले. येथील राजमुद्रा फाऊंडेशन आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, धुळे येथील शिवाजी विद्या प्रसारक च्या संचालिका अश्विनी पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक विनोद भैय्या पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, मारवड ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, के.डी.पाटील, किरण सूर्यवंशी, राजश्री पाटील आदी उपस्थित होते.

प्राजक्ता गायकवाड पुढे म्हणाल्या की, घराचा उंबराच्या आतील आणि बाहेरील जबाबदारी महिला उत्तमप्रकारे सांभाळते. एकविसाव्या शतकात स्त्री ही सामर्थ्यवान असूनही दररोज बऱ्याच वाईट घटना घडत असतात. त्यासाठी स्त्रियांनी धाडसी आणि संयमी होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, महाराणी येसुबाई, महाराणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ यांच्यासारख्या कितीतरी महान स्त्रियांचा इतिहास लाभला असून त्यांचे व्यक्तिमत्व आणि संस्कार यांचा विचार करुन स्त्रियांना सन्मान द्यायला हवा. बचत गटाला महाराणी येसुबाई बचत गट नाव दिले असून त्याप्रमाणे तुमचे कार्य सुरु असून महिलांना एक उत्कृष्ठ संधी अशा कार्यक्रमातून उपलब्ध करुन दिली आहे. श्याम पाटील यांनीही सामाजिक उपक्रमातून वेगवेगळ्या संकल्पना राबवित असल्याचे सांगून त्यांच्या उपक्रमाचे कौतुकही प्राजक्ता गायकवाड यांनी केले.

कृषीभूषण साहेबराव पाटील म्हणाले की, स्त्री ही आदिशक्ती यांचा अवतार असून ती माता, बहीण, पत्नी, कन्या आदी रूपात आपल्याला तिचे व्यक्तिमत्व पहावयास मिळते. श्याम पाटील सामाजिक उपक्रमातून वेगवेगळ्या संकल्पना राबवित असल्याने त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. राजमुद्रा फाऊंडेशन अंतर्गत नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यामुळे श्याम पाटील यांनी सामाजिक सलोखा जपला असल्याचे गौरवोद्गार जि.प.सदस्या जयश्री पाटील यांनी काढले.

राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्याम पाटील व महाराणी येसुबाई बचत गटाच्या अध्यक्षा आरती श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीमने नवरात्रौत्सवात महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या. यामुळे त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळाला. गेल्या सात दिवसात झालेल्या ‘स्त्री शक्तीचा जागर’ या कार्यक्रमात पार पडलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले. यावेळी नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. विजेत्यांना पैठणी, सोन्याची नथ, चांदीची राजमुद्रा, गिफ्ट हॅंपर बक्षीसे वाटप करण्यात आली. पर्यवेक्षिका म्हणून प्रा. मोनाली पाटील, शितल सुमित सूर्यवंशी, प्रा. विशाखा पाटील यांनी काम पाहिले. यात, मुग्धा कुंदन खैरनार, आश्विनी रविंद्र साळुंखे, पुनश्री संतोष चौधरी, नेहा नितीन पाटील, करुणा वानखेडे, प्रियंका राजू सोनी, प्रिया शशिकांत पाटील, पायल पाटील, श्वेता ठाकरे, मोनिका दावणारी, जिया बेदाणी, पायल वसंत कोळी, अनिता विजय भदाणे, अनुष्का शशिकांत पाटील आदींना बक्षीसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमा अंतर्गत बहुसंख्य मुली आणि महिला यांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला होता.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!