हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद : गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील

अमळनेर : सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर शाळेतील विविध स्पर्धामध्ये सहभागी झाले पाहिजे. निबंध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार करण्यास वाव मिळतो. हिंदी भाषा ही देशाची संपर्काची भाषा आहे. हिंदी अध्यापक मंडळ भाषेचा प्रचार करण्यासाठी तत्पर असते. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळतो आहे. राष्ट्रनिर्माणात हिंदीचे योगदान महत्त्वाचे असून हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत अमळनेर गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात व्यक्त केले. ते अमळनेर येथील सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. व्यासपीठावर शहादा युनियन बँकेचे प्रबंधक मयुर पाटील, माजी गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ.वसुंधरा लांडगे, श्रीमती भारती भांडारकर, सौ.निरंजना वानखेडे, श्री.राजेंद्र निकम सर, प्रताप महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.डॉ.कल्पना पाटील (ग्रामीण परीक्षक), प्रा.सोपान भवरे (शहरी परीक्षक) होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
शहादा युनियन बँकेचे प्रबंधक मयूर पाटील म्हणाले की, हिंदी विषयी जनजागृती करून हिंदी भाषेविषयीचा आदर निर्माण करणे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे त्यासाठी अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ नेहमीच प्रयत्नशील असते. खानदेश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधरा लांडगे म्हणाल्या की, देशाच्या विकासात राष्ट्रभाषेचा सन्मान महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिंदी विषयी जनजागृती करून हिंदी अध्यापक मंडळांनी केलेले कार्य अभिनंदनीय आहे.
हिंदी अध्यापक मंडळाने सेवानिवृत्तीनंतरही कार्यक्रमाला सन्मान दिल्याबद्दल माजी गटशिक्षणाधिकारी सौ.शर्मिला चव्हाण यांनी आभार मानले. हिंदी भाषा ही संपर्क भाषा असून तिचा आदर करणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य असल्याचे सांगत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व पुरस्कार्थी बांधव व भगिनींचे शर्मिला चव्हाण यांनी अभिनंदन केले.
साने गुरुजी शिक्षण मंडळाचे सचिव संदीप घोरपडे म्हणाले की, सध्या कृती शिक्षणाची गरज आहे असे सांगत शिक्षणात स्पर्धा परीक्षा आणि साहित्यात योगदान इतर सर्व बाबतीत हिंदी विषयी अनुकुलता निर्माण करणे तसेच संगीत कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात हिंदीचे योगदान काय ? यावरही प्रकाश टाकला जातो. पण शाळा, कॉलेज, संस्था कार्यालये, आकाशवाणी, प्रसारमाध्यमे यासोबत प्रत्येक संपर्काच्या ठिकाणी हिंदी वापरण्यास कसा वाव मिळेल यासाठी प्रयत्न करत आपणही हिंदी विषयी आदर व्यक्त करणे, त्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी प्रेम निर्माण करणे व वर्षभर कार्यक्रम घेणे यासाठी शिक्षक अध्यापकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कारार्थी श्रीमती भारती भांडारकर, सौ.निरंजना वानखेडे, श्री.राजेंद्र निकम यांनीही मनोगत व्यक्त करत हिंदी अध्यापक मंडळाच्या सदैव ऋणात राहण्याचे सुतोवाच केले.
बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन दिपक पवार, डॉ.किरण निकम, कविता मनोरे यांनी तर आभार दिलीप पाटील यांनी केले. यावेळी अमळनेर तालुक्यातील हिंदी शिक्षक व सर्व उत्तीर्ण व बक्षीस पात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा निकाल…
अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ, शिक्षण विभाग पंचायत समिती, अमळनेर आणि युनियन बँक ऑफ इंडिया, शहादा यांच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हिंदी दिवसानिमित्त तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातून ४५ माध्यमिक शाळेच्या २६०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. जवळपास ५३ हिंदी शिक्षक व मुख्याध्यापकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेचा निकाल नुकताच कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर झाला होता तो खालीलप्रमाणे…
ग्रामीण भाग (मोठा गट) : प्रथम : प्रतिक्षा अरुण पाटील (आबासाहेब एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे), द्वितीय : पियुष ज्ञानेश्वर महाजन (शारदा माध्य. उच्च माध्य. विद्यालय, कळमसरे ), तृतीय : कल्याणी तुकाराम बाविस्कर (आदर्श माध्य. उच्च माध्य. विद्यालय जळोद – अमळगाव), उत्तेजनार्थ : (१) वंशिका प्रदीप बाविस्कर, (बालाजी विद्यालय गांधली- पिळोदे), (२) नंदिनी दिलीप पाटील (एकात्मता माध्यमिक विद्यालय, शहापूर), (३) तेजल किरण कोळी (के. पी. सोनार हायस्कूल, जैतपीर)
ग्रामीण भाग (छोटा गट) : प्रथम : खुशी हेमलाल कुंभार (दत्त माध्यमिक विद्यालय,पातोंडा), द्वितीय : प्रदीप मुकेश शेवाळे (सरस्वती माध्यमिक विद्यालय, पाडसे), तृतीय : गौरव प्रकाश कोळी (आदर्श माध्य. व उच्च माध्य. विद्यालय अंमळगाव) उत्तेजनार्थ : (१) तुषार रायसिंग राठोड ( माध्यमिक आश्रम शाळा रणाईचे ), (२) जानवी अमोल पाटील (पं.नेहरू माध्य. विद्यालय फाफोरे), (३) कुणाल जगदीश पाटील (उदय माध्यमिक विद्यालय, झाडी)
शहरी विभाग (मोठा गट) : प्रथम : निखिल प्रवीण ठाकरे (साने गुरुजी नूतन माध्य. विद्यालय, अमळनेर), द्वितीय : सारंग तुषार देवरे (सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर), तृतीय : भक्ती योगेश खैरनार (साने गुरुजी कन्या हायस्कूल,अमळनेर),
उत्तेजनार्थ : (१) आनंदी परेश पुरभे (न्यू व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल, अमळनेर), (२) निलेश ज्ञानेश्वर मोरे (विजय नाना पाटील आर्मी स्कूल, अमळनेर), (३) प्रणव मुरलीधर भोई (लोकमान्य विद्यालय, अमळनेर)
शहरी विभाग छोटा (गट) : प्रथम : कौशल जगदीश पाटील (अॅड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर), द्वितीय : समीक्षा अभय बिऱ्हाडे, तृतीय : शिवम त्रिपाठी (सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर), उत्तेजनार्थ : (१) सारंग विजयसिंह पाटील (पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूल,अमळनेर), (२) प्रतीक्षा जयवीर पाटील (सावित्रीबाई कन्या माध्य.विद्यालय,अमळनेर), (३) अक्सा कय्युम खाटीक (अल-फैज गर्ल्स उर्दू स्कूल,अमळनेर)
याप्रमाणे निकाल घोषित करण्यात आलेला आहे. प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या उपप्राचार्य प्रा.डॉ. कल्पना पाटील यांनी ग्रामीण विभाग तर सोपान भवरे यांनी शहरी विभाग च्या निबंध परिक्षणाचे कामकाज पाहिले. यासोबतच हिंदी निबंध स्पर्धा व इतर हिंदी विषयाच्या स्पर्धांचे आपल्या शाळेत आयोजन करणाऱ्या ५३ हिंदी शिक्षकांना ‘कृतिशील हिंदी अध्यापक’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या हिंदी निबंध स्पर्धेसाठी ४३ शाळेच्या हिंदी शिक्षकांनी आपापल्या शाळेतून २ उत्कृष्ट निबंध मंडळाकडे परिक्षणासाठी पाठवले होते. त्या तालुक्यातील १४२ विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर पारितोषिक देण्याचा निर्णय हिंदी अध्यापक मंडळाने घेतला आहे. या तालुकास्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा शहादा चे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले आहे गटशिक्षणाधिकारी श्रीमती शर्मिला चव्हाण यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले आहे. स्पर्धेतील उर्वरित सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेला यशस्वीतेसाठी मार्गदर्शक दिपक पवार, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे, नारायण चौधरी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर,सचिव दिलीप पाटील, सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी, प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम, श्रीमती कविता मनोरे, श्रीमती योगेश्री पाटील, प्रशांत वंजारी, जितेंद्र बाविस्कर, प्रदीप चौधरी, निवृत्ती पाटील सह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. निबंध स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.