
अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथे ॲग्री टेक फेड फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे नाफेड अंतर्गत शासकीय हरभरा हमीभाव केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले. सर्वप्रथम प्रगतीशील शेतकरी सचिन जयवंतराव पाटील यांच्या हस्ते गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे व वजन काट्याचे पूजन करुन उद्घाटन करण्यात आले. सधन कास्तकार रमेश यशवंत पाटील यांचा टोपी व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गावातील प्रगतीशील शेतकरी नंदकिशोर व्यंकट पाटील, लक्ष्मण व्यंकट पाटील, दिलीप शिवदास चौधरी, संजय दौलत चौधरी, संदीप संभाजी पाटील, राजेंद्र पांडुरंग पाटील, बापू कोळी, सदाशिव यशवंत कोळी, पत्रकार भूषण सुरेश चौधरी, पत्रकार शाम सोनवणे, विलास रघुनाथ पाटील, शेखर तुळशीराम पाटील, विश्वास उत्तम चौधरी, सुरेश बळीराम खैरनार, हरीश केदारनाथ गुजराथी आदींसह ॲग्री टेक फेड फार्मर प्रोड्युसर कंपनी चे डायरेक्टर तुषार महाले, योगेश पाटील, दीपक धनगर, किरण महाजन, नितीन कदम, अमोल सूर्यवंशी, कंपनीचे लेखापाल महेश माकडे उपस्थित होते. पंचक्रोशीतील खेडी, खौशी, जळोद, हिंगोणा, कलाली, गांधली, पिळोदा, पिंपळी, निंभोरा, पिंगळवाडे, मेहेरगाव व दोधवत या परीसरातील शेतकरी उपस्थित होते.
