खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. अनिल शिंदे तर कार्योपाध्यक्ष पदी प्रदीप अग्रवाल यांची वर्णी लागणार

अमळनेर : येथील बजरंग पॅलेस मध्ये नुकतीच (मंगळवारी) आशिर्वाद पॅनेलचे नेते कुंदनलालजी अग्रवाल, बजरंग शेठ अग्रवाल, गोविंद दादा मुंदडे, प्रकाशभाऊ मुंदडे यांची बैठक झाली. यावेळी हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, डॉक्टर अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, संदेश गुजराथी, निरज अग्रवाल यांची उपस्थिती होती. या बैठकीत खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. अनिल शिंदे तर कार्योपाध्यक्ष पदी प्रदीप अग्रवाल यांची नावे सर्वानुमते निश्चित करण्यात आली आहेत. या संदर्भात दिनांक २ मे २०२३ रोजी कार्यकारिणी मंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्या बैठकीत कार्यकारी अध्यक्षपदी डॉ. अनिल शिंदे तर कार्योपाध्यक्ष पदी प्रदीप अग्रवाल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात करण्यात येणार आहे. दोन्ही पदाधिकारी दुसऱ्यांदा खानदेश शिक्षण मंडळावर निवडून आले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!