विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते होणार प्रकाशन
अमळनेर : येथील शिक्षिका रेखा वाल्मीक मराठे-पाटील लिखित “चतुरंग” व “फुलामुलांची शाळा” या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा शनिवारी (ता.२९) सायंकाळी साडेचारला येथील पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूलच्या रोटरी क्लब हॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठराव गायकवाड अध्यक्षस्थानी राहतील. विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
पोलीस उपअधिक्षक राकेश जाधव, खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी, डायटचे अधिव्याख्याता डी.बी.साळुंखे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ‘चतुरंग’ काव्य संग्रह कामी शब्दगंध समूह, छत्रपती संभाजी नगर यांनी.. तर ‘फुलामुलांची शाळा’ या शैक्षणिक काव्य संग्रह कामी परिस प्रकाशन, पुणे यांनी विशेष सहकार्य केले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन खान्देश साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.