
अमळनेेर : तालुक्यातील ग्राम विकास मंडळ मारवड संचलित कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालय येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय शांताराम पाटील यांना भारत सरकार पुरस्कृत नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परीषद फोरम यांच्याकडून “महाराष्ट्र विद्यारत्न ” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राचार्य डॉ एस जे शेख, माजी प्राचार्य डॉ मधुकर शिंदे, उपप्राचार्य डॉ शाम पवार आणि मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले सर यांच्या हस्ते देण्यात आला.
गेली २३ वर्षांपासून प्रा. डॉ. संजय पाटील मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करत असून क. ब. चौ. उ. म. विद्यापीठात पीएच डी चे मार्गदर्शक आहेत. सदर पुरस्कार एस एन डी टी उमेन्स युनिव्हर्सिटी, मुंबई. अंतर्गत नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुक्मिणीताई आर्टस् अॅन्ड कॉमर्स उमेन्स कॉलेज अमळनेर येथील आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परीषद निमित्ताने प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र विद्यारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मारवड महाविद्यालयाचे अध्यक्ष, सर्व संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर सहकारी यांनी डॉ. संजय पाटील यांचे कौतुक केले. दिव्यचक्र परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन !